अमेरिकेच्या एरिझोना प्रांतातील पुरात नऊ जण दगावले

टोंटो – अमेरिकेच्या एरिझोना प्रांतातील टोंटो राष्ट्रीय वन विभागातील पूरात नऊ जण मरण पावल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण त्या वन विभागातील एका ओढ्या लगत उभे असताना अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात ते वाहनू गेले. हा नऊ जणांचा गट एक कुटुंब आणि त्यांच्या मित्र मंडळींचा होता. त्यात एका दोन वर्षीय बालकाचाही समावेश होता.

मित्रमंडळींचा हा गट एक दिवसाच्या सुट्टीसाठी म्हणून त्या भागात आला होता. तेथील ओढ्याच्या पाण्यात ते खेळत असताना एका जोराच्या लोंढ्याने त्यांचे प्राण घेतले. हे सर्व जण 2 ते 60 वर्ष वयोगटातील होते. ते ज्या भागात खेळत होते तेथे पाऊस नव्हता. पण शेजारच्याच पर्वतराजीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याच्या पाण्याचा लोंढा त्या भागात वाहात आला त्यात त्यांचे बळी गेले.

हा भाग पर्यटकांच्या जलक्रिडेसाठी लोकप्रिय आहे. तेथे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. हे लोक वाहून गेल्याची माहिती समजतात चाळीस जणांचे बचाव पथक तातडीने तेथे पोहचले. पण वाहून गेलेल्यांपैकी एकालाहीं वाचवण्यात त्यांना यश आले नाही. पाच मुले आणि चार प्रौढांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले आहेत. अन्य चार जणांन तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)