अमेरिकेचे सीरियावर हल्ले, फान्स-इंग्लंडचेही सहकार्य

वॉशिंग्टन – अमेरिकेने सीरियावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याचे लक्ष्य बशर असद यांच्या रासायनिक शस्त्रांचा नाश करण्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले आहेत.

या हल्ल्यामध्ये अमेरिकेसोबत फ्रान्स आणि इंग्लंडही असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात सीरिया सरकारने विषारी वायू सोडून 60 निरपराध नागरिकांची हत्या केली होती. त्यानंतर सीरियावर लष्करी करवाई करण्याचे संकेत अमेरिकेने दिले होते. त्याप्रमाणे ही कारवाई सुरु केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)