अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश रूग्णालयात

ह्युस्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सिनीयर हे अत्यवस्थ असून त्यांच्यावर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते 93 वर्षांचे आहेत. त्यांच्या छातीत संसर्ग झाला असून तो त्यांच्या रक्तातही पोहचला आहे.

तथापी ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते जिम मॅकग्राथ यांनी दिली. त्यांच्या पत्नी बार्बरा बुश यांचे गेल्या मंगळवारीच निधन झाले आहे. त्या अमेरिकेच्या एकमेव अशा महिला होत्या की त्यांचे पती आणि चिरंजीव या दोघांनाही अमेरिकेचे अध्यक्षपद भुषवले आहे. त्यांचे वैवाहिक जीवन 73 वर्ष टिकले होते. जॉर्ज बुश हे अमेरिकचे 41 वे अध्यक्ष होते. रोनाल्ड रेगन अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्षपदही भुषवले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)