इस्लामाबाद – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ हे पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी इस्लामाबादेत दाखल झाले. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे.

सध्या अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदतही रोखून धरली आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्व आहे. त्यांच्या समवेत अमेरिकेच्या लष्कराचे संयुक्त प्रमुख जनरल जोसेफ डनफोर्ड हेही आले असून ते इम्रान खान आणि पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्याशी द्विपक्षीय बाबींवर चर्चा करणार आहेत.

पाकिस्तानात कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी गटांबाबत पाकिस्तान सरकारने कडक भूमिका घ्यावी आणि युद्धग्रस्त अफगाणिस्तान बाबत या देशाने विधायक भूमिका घ्यावी अशी अमेरिकेची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)