अमेरिकेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर बराक ओबामांना स्पोर्टीफायची “जॉब’ ऑफर?

न्यूयॉर्क (अमेरिका). दि. 10-अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांनी राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यापूर्वीच “जॉब’ ऑफर आली आहे. आपली आठ वर्षांचा राष्टृाध्यक्षपदाचा कार्यकाल आटोपून बराक ओबामा दोन आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सूत्रे देऊन पायउतार होणार आहेत. मात्र जगातील एक अग्रगण्य स्ट्रीमिंग कंपनी स्पोर्टीफायने त्यांना “जॉब’ची ऑफर दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये स्पोर्टीफायने म्हटले आहे, की “प्रेसिडेंट प्लेलिस्ट’ची एक जागा रिक्‍त असून त्यासाठी आम्हांला उमेदवाराची गरज आहे.
स्पोर्टीफायचे सीईओ डॅनियल एक यांनी सोमवारी ट्‌विट करून आपल्याला पाहिजे असलेल्या उमेदवाराची पात्रता नमूद करताना म्हटले आहे, की उमेदवाराला जगातील एक अग्रगण्य देश चालवण्याचा किमान आठ वर्षांचा अनुभव असावा. त्याला नोबेल पारितोषिक मिळालेले असल्यास अधिक पसंती देण्यात येईल. (बराक ओबामा यांना 2009 साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले होते.) जगातील अग्रगण्य संगीतकार आणि कलाकार यांच्याशी त्याचे चांगले संबध असावेत. त्याच्या वाढदिवसाला केंड्रिक लामारने कार्यक्रम केलेला असावा. तो एक उत्तम वक्‍ता असावा. पत्रकार परिषदांमध्ये प्लेलिस्टवर त्याला ठामपणे बोलता आले पाहिजे.
अलीकडेच ओबामा यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले होते, की स्पोर्टीफायकडून “जॉब’ ऑफर येण्याची मी वाट पाहत आहे. त्यासंदर्भात स्पोर्टीफायचे सीईओ डॅनियल एक यांनी सोमवारी ट्‌विट केले आहे. ओबामा यांनी स्पोर्टीफायसाठी आपल्या आवडीच्या प्लेलिस्ट तयार केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)