अमेरिकेकडून तालिबान्यांशी चर्चा करण्यास नकार

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी बातचीत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी चांगले संकेत असल्याचे मानले जात आहेत. दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेच्या भारत विरोधात आहे. तालिबान्यांशी चर्चा करण्याच्या पाकिस्तान, चीन आणि रशियाच्या विरोधात आता अमेरिका उभा राहिला आहे. अफगाणिस्तानच्या विषयावर पाकिस्तान, चीन आणि रशिया भारताला सहभागी करून घेऊ इच्छित नाही. कारण भारत दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही, या भूमिकेवर ठाम आहे.
तालिबानने हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानच्या संविधानाचा स्वीकार करून अल कायदाशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. भारत याला रेड लाइन्स असे संबोधतो. तालिबानने अफगाणिस्तानच्या अटी मान्य केल्या तरच त्यांच्याशी चर्चा शक्य आहे. तरीही याचा निर्णय अफगाणिस्तानने केला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 16 वर्षांपासून अशांती पसरली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प  यांनी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या सहा नेत्यांवर निर्बंध आणत पाकिस्तानला जबर हादरा दिला होता. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध एकजुटीने काम करण्याचे वचन पाळत अतिरेक्यांना आश्रय आणि पैसा पुरविणे थांबवावे, यासाठीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबाव वाढविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)