अमेरिकेकडून चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार युद्ध छेडले आहे. त्यानुसार अमेरिकेने चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले आहे. या निर्णयाचे व्हाइट हाऊसने जोरदार समर्थन केले आहे. चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसने दिली आहे.

चीनने बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.
चीनमधून येणाºया वस्तूंवर ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत.

अमेरिकी बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या चोरीबाबत चौकशीनंतर आलेल्या अहवालाच्या आधारे हे शुल्क लावण्यात आले. व्हाइट हाऊसच्या प्रशासकीय अधिकाºयाने सांगितले की, एक अब्ज व्यापार तुटीमागे ६ हजार रोजगार गमवावे लागतात. काही अंदाजानुसार, आमच्या व्यापार तुटीमुळे चीनमध्ये २ दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)