अमेरिका व चीनदरम्यान व्यापारयुद्ध पेटले

         दोन्ही देशांकडून परस्परांच्या वस्तूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 60 अब्ज डॉलरचे आयात शुल्क लावण्याची सूचना आपल्या वाणिज्य विभागाला केली आहे. त्यानंतर बदल्याच्या तयारीत असलेल्या चीनच्या व्यापार मंत्रालयाने अमेरिकेच्या ज्या वस्तूंवर आयात शुल्क लावले जाणार आहे, त्याची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजार आणि इतर बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तर फक्‍त सुरुवात असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

चीन अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. मात्र अमेरिकेतून आयात फारशी करीत नाही. त्यामुळे अमेरिकन ग्राहक चीनमधील वस्तू खरेदी करतात. त्या वस्तू अमेरिकेत तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे फटका बसतो. या कारणामुळे अमेरिकेच्या 20 लाख नोकऱ्यावर परिणाम झाला आहे. त्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आपण या धाडशी उपाययोजना करीत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

तर अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांना धाब्यावर बसून हे निर्णय घेतले आहे. त्यामुळे आम्ही हे सहन करणार नाही. अमेरिकेने केवळ चीनच्या वस्तूंवर आयात कर वाढविला तर चीन केवळ अमेरिकेच्या वस्तूंवर आयात कर लावणार असल्याचे चीनने सांगितले आहे. अमेरिकेने गेल्या पंधरवडयात अमेरिकेने येणाऱ्या पोलाद आणि ऍल्युमिनियमवर आयात शुल्क लावले होत. मात्र, नंतर अमेरिकेने आल्या मित्र राष्ट्रांना यातून वगळले आहे. हे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमात बसत नाही, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उद्योगाचे आणि कामगाराचे हितरक्षण करण्यासाठी हे आवश्‍यक असल्याचे सांगिंतले आहे.

चीन फक्‍त अयोग्य व्यापारच करीत नाही तर अमेरिकेचे तंत्रज्ञान वापरतो. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. गेल्या सात महिन्यांपासून यावर चौकशी झाली आहे. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आता या निर्णयात बदल केला जाणार नाही. चीन अमेरिका व्यापारात 370 अब्ज डॉलरची तूट आहे ती कमी करण्यासाठीं चीनला सांगितले होते. मात्र त्याकडे चीनने दुर्लक्ष केल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. 2001 मध्ये चीनची अर्थव्यवस्था केवळ 1 लाख कोटी डॉलरची होती आता तीच अर्थव्यवस्था 12 लाख कोटी डॉलरची झाली आहे. याच काळात अमेरिकेचा विकासदर 3.5 टक्‍क्‍यावरून केवळ 2 टक्‍क्‍यावर आला आहे. त्यामुळे अमेरिकेला स्वत:च्या देशातील नागरिकासाठी हे उपाय योजावे लागत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)