अमेरिका-रशिया यांच्यात ठिणगी; ६० अधिकाऱ्यांची हकालपट्टी

वॉशिंग्टन : हेरगिरीचा ठपका ठेवत अमेरिकेने रशियाच्या ६० अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आधीच दोन देशांत असलेल्या वादात ठिणगी पडल्याचे मानले जात आहे. याशिवाय सिएटल येथील रशियन दूतावास बंद करण्याचे आदेशही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

हेरगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अमेरिकेने रशियाला दिला आहे. गच्छंती केलेल्या अधिकार्‍यांना अमेरिका सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली दिली आहे. या अधिकार्‍यांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जर्मनी, पोलंड, फ्रान्स, युक्रेन आणि लॅटव्हिया या पाच युरोपियन देशांनीही रशियन अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यूरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)