अमेरिका -रशिया काळ्या समुद्रात आमने-सामने

वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परस्परांचे कट्टर विरोधक असणारे अमेरिका आणि रशिया वेळोवेळी स्वत:च्या लष्करी सामर्थ्याचेही प्रदर्शन करत असतात. दरम्यान, सोमवारीदेखील काळया समुद्रात अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये संघर्षाची स्थिती उत्पन्न झाली होती. अमेरिकन नौदलाचे टेहळणी विमान आणि रशियाचे फायटर जेट एसयू-27 परस्परांच्या अत्यंत निकट आले होते. दोन्ही विमानांमध्ये फक्त पाच फुटांचे अंतर होते. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
अमेरिकेने रशियाकडे या घटनेचा निषेध नोंदवला असून रशियाने आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करावे असे अमेरिकेने रशियाला सुनावले आहे. रशियाने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या विमानाला रोखताना सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यात आली होती असे रशियाने म्हटले आहे. अमेरिकन नौदलाचे EP-3 हे हेरगिरी विमान आंतरराष्ट्रीय मोहिमेवर असताना रशियन रडारवर ट्रेस झाले.  या विमानाला अटकाव करण्यासाठी रशियाचे एसयू-27 लगेच हवेत झेपावले. ही दोन्ही विमाने काळया समुद्रावरुन उड्डाण करत असताना त्यांच्यातील अंतर अत्यंत कमी होते. दोन तास चाळीस मिनिटे एसू-27 ने पाठलाग केला असा आरोप अमेरिकेने केला आहे. रशियन लष्कराला आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत उड्डाण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सुरक्षिततेसाठी जे आंतरराष्ट्रीय निकष आहेत त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे असे अमेरिकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)