अमेरिका, रशियानंतर आता अफगाणिस्तानात चीनचा प्रवेश

काबूल : जागतिक महासत्तांसाठी अफगाणिस्तान नेहमीच आव्हान ठरले आहे. रशियाने 1979 मध्ये अफगाणवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या सैन्याला तेथे नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील दहशतवादाला समाप्त करण्यासाठी स्वतःचे सैन्य उतरविले आणि मागील दोन दशकांपासून अफगाण त्याच्यासाठी ‘दुसरा व्हिएतनाम’ ठरला आहे. आता नवी ‘महासत्ता’ होत असलेल्या चीनची अफगाणवर नजर आहे. चीन  अफगाणमार्गे आशियावर पकड निर्माण करू इच्छितो. रशिया आणि अमेरिकेप्रमाणे चीन देखील अफगाणमध्ये अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे.

अफगाणिस्तानात चीनचा प्रवेश झाल्याचा दावा चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने केला. वन बेल्ट वन रोड योजनेंतर्गत चीन-पाक आर्थिक पट्टय़ाची कक्षा वाढवून या प्रकल्पाचा विस्तार अफगाणिस्तानात करण्याचा विचार चीनच्या सरकारने चालविला आहे. अफगाण या प्रकल्पात सामील होण्यासाठी तयार असल्याचे चीनचे मानणे आहे. अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी अफगाण सीपीईसीत सामील होऊ इच्छितो असे विधान चीनचे विदेश मंत्री वांग ई यांनी केले. अफगाण सीपीईसीत सामील झाल्यास मध्य आणि पूर्व आर्थिक पट्टय़ाला जोडण्याचे काम सोपे होईल असे चीनला वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)