अमेरिका-मेक्‍सिको-कॅनडा 2026 विश्‍वचषकाचे यजमान 

अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांनी 2026 फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची शर्यत जिंकली आहे. विश्‍वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येला फिफाच्या आज पार पडलेल्या बैठकीत अमेरिका, कॅनडा व मेक्‍सिको यांनी निकटचा प्रतिस्पर्धी मोरोक्‍कोचा 134 विरुद्ध 65 असा सहज पराभव केला. त्यामुळे उत्तर अमेरिका खंडात 1994 नंतर पहिल्यांदाच विश्‍वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या वेळी अमेरिकेने ही स्पर्धा आयोजित केली होती. फिफाच्या निरीक्षकांनी अमेरिकेसह मेक्‍सिको व कॅनडाचा दौरा करून त्यांना पाचपैकी साडेचार गुण दिले. तर मोरोक्‍कोला केवळ 2.7 गुण मिळाले. त्यामुळे सदस्यांसाठी निवड करणे सोपे झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)