अमेरिका पुन्हा हादरली… मुलाने केला शाळेत गोळीबार

वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांत अमेरिकेला हादरवणाऱ्या शाळकरी मुलांच्या गोळीबार प्रकरणात आणखी एक भर पडली आहे. प्रेमप्रकरणातून एका माथेफिरू १७ वर्षांच्या मुलाने शाळेत गोळीबार केल्याची घटना मेरिलँड येथे घडली आहे. दरम्यान, बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात हल्लेखोर मुलाचा मृत्यू झाला. या घटनेत गोळीबारात १६ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांवरही उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास ऑस्टिन नावाचा मुलगा शाळेत पोहोचला. त्याच्याकडे पिस्तूल होती. त्याने एका १६ वर्षांच्या मुलीवर गोळीबार केला. यात ती आणि एक १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. शाळेतील सुरक्षा अधिकाऱ्याने ऑस्टिनच्या दिशेने गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)