अमेरिका दौऱ्यातून महिलांना झाली जागतिक बाजारपेठेची ओळख- पंकजा मुंडे

मुंबई: अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी विद्यापीठात आयोजित तिसऱ्या इंडिया ग्लोबल समीटमध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी आज सहभाग घेतला. या महिलांनी बचतगटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्रातील ग्रामीण महिला लघुउद्योगांच्या क्षमतांचेही यावेळी सादरीकरण केले.

महिलांद्वारे उत्पादित वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, हातमागाची उत्पादने पाहून देश-विदेशातील पाहुणे भारावून गेले. अमेरिकेसह इंग्लड, चीन, कॅनडा, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रतिनिधींनी या समीटमध्ये सहभाग घेतला होता. बचतगट चळवळीमधून ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला महाराष्ट्रात मिळत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतूक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील बचतगटाची चळवळ ही आता फक्त बचतीपुरती मर्यादीत राहिली नसून त्यातून महिला लघुउद्योजक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्यांना जागतिक उद्योजकता, व्यवहार, बाजारपेठ यांची ओळख करुन देण्यासाठीच या अमेरिका दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहिती  मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील ज्या महिलांनी आजवर गावाच्या सीमा ओलांडल्या नाहीत, त्या महिला मागील आठवड्यापासून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग आणि विक्री करीत आहेत. येथील खाद्यसंस्कृती आणि राहणीमानाचा अभ्यास करीत आहेत, जेणेकरून आपली उत्पादने येथील लोकांना अनुकूल बनविता येतील. ज्या महिला निरक्षर किंवा अत्यल्प शिक्षीत आहेत त्या देखील सुलभ इंग्रजी शब्दांचा वापर करीत आहेत. रुपया आणि डॉलरमध्ये व्यवहार करत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच फलदायी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)