अमेरिका-चीनच्या ट्रेड वॉरमुळे सोने महागणार

मुंबई : येत्या काही दिवसामध्ये सोन्याचा दर 32 हजार किंवा त्याहून अधिक महाग होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारी युद्धामुळे हा परिणाम होण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरु आहे. चीनने अवैध मार्गांनी अमेरिकेची बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करत, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 60 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत.

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहे. शिवाय, या निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही पडण्याची शक्यता आहे. या ट्रेड वॉरमुळे सध्या करेन्सी आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर कमालीचे वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कच्च्या तेलाच्या दरातही चढउतार पाहायला मिळत आहेत. कारण, सौदी अरेबियाने यापूर्वीच ओपेकच्या उत्पादनात कपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली होती.

पण त्यातच आता नव्याने उद्भवलेल्या ट्रेड वॉरच्या संकटामुळे 2019 मध्ये ओपेककडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिका इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर हे निर्बंध लागू झाल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)