अमेरिकन लष्कराची सीरियातून लवकरच माघार

अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा
रिचफिल्ड – सीरियातून अमेरिकेचे लष्कर लवकरच मागे घेतले जाईल अशी घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. ओहिओ येथील एका कामगार मेळाव्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी जी भूमी ताब्यात घेतली होती, त्यातील बहुतेक भूमी सोडवण्याचे काम अमेरिकन लष्कराने जवळपास पुर्ण करीत आणले आहे. त्यामुळे आम्ही आता सीरियातून लवकरच बाहेर पडणार असून आता त्या प्रदेशाची काळजी अन्य लोकांनी घ्यावी असे ते म्हणाले.

अमेरिकेनंतर ही काळजी कोण घेणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. सीरियातील बशर अल असद यांच्या सरकारला समर्थन देण्यासाठी रशिया आणि इराणच्या फोैजा मोठ्या प्रमाणावर तेथे कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनीच ही जबाबदारी आता स्वीकारावी असे बहुधा त्यांनी सुचवले असावे असे सांगितले जात आहे. अमेरिकन लष्कराचे सुमारे दोन हजार जवान आणि अधिकारी पुर्व सरियात कार्यरत आहेत. तेथील इस्लामिक स्टेटच्या गनिमांना नेस्तानबूत करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने स्थानिक बंडखोरांचीही मदत घेतली आहे. तथापी या विषयावरून त्यांचे रशियाशी मतभेद आहेत.

सीरियातून अमेरिका माघार घेणार असल्याचे अमेरिकेचे विदेश मंत्री रेक्‍स तिलेरसन यांनी जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते, पण तिलेरसन यांचीच ट्रम्प यांनी अलिकडे हकालपट्टी केली आहे. दरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सीरियातून माघारीच्या घोषणेला विरोध दर्शवताना म्हटले आहे की त्यामुळे इराणला तेथे हस्तक्षेप करण्यास मोठा वाव मिळेल आणि अध्यक्ष असद हे आपली तेथील पकड पुन्हा मजबूत करतील. त्यांनी आपल्याच देशातील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू केला असल्याने अमेरिकेचे तेथील वास्तव्य आवश्‍यक बनले आहे असेही तिलेरसन यांनी नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)