अमेरिकन राजदूत निक्की हेली यांनी केली गुरुद्वारात सेवा

नवी दिल्ली – अमेरिकन राजदूत निक्की हेली यांनी आज शीशगंज गुरुद्वारात सेवा केली. त्यांनी गुरुद्वाराच्या लंगरमध्ये रोटी बनवण्याचे कामही केले. संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निक्की हेली भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्यानंतर त्यांने जामा मशिदीला भेट दिली. भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने निक्की हेली यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निक्की हेली यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-अमेरिका संबंध वाढवण्याबरोबरच धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रांतील वाढत्या संबंधांचा उल्लेख हेली यांनी केला. बुधवारी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टिन यांच्यासह निक्की हेली यांनी हुमायूनच्या मकबऱ्याला भेट दिली.

भारतात आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखे मला वाटले असे निक्की हेली यांनी सांगितले. अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी मिळालेल्या निक्की हेली या मूळ भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)