अमेरिकन मंगळ यान क्‍युरियासिटी रोव्हरची मंगळावर 6 वर्षे पूर्ण

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकन मंगळ यान क्‍युरियासिटी रोव्हरने मंगळावरील वास्तव्यची सहा वर्षे पूर्ण केली आहेत. 17 कॅमेरे आणि अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेले क्‍युरियासिटी रोव्हर नासाने नोव्हेंबर 2011 मध्ये लॉंच केले होते. सुमारे दहा महिन्यांचा प्रवास करत रोव्हर 6 ऑगस्ट 2018 रोजी मंगळावर उतरले होते. तेव्हापासून ते मंगळावरच कार्यरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहा वर्षांपूर्वी मी मंगळाच्या भूमीला स्पर्श केला. माझा मंगळावरील सहावा वाढदिवस मी आयर्न ऑक्‍साईडबरोबर साजरा करत आहे. असे मंगळावर 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रोव्हरने ट्विट केले आहे.

मंगळाला लाल ग्रह असे नाव पडले आहे, ते त्यावर असलेल्या आयर्न ऑक्‍साईडमुळेच. कारण आयर्न ऑक्‍साईडच्या लाल रंगामुळेच मंगळ लाल आहे. आजवर क्‍युरियासिटीने पाण्याचा शोध घेण्याबरोबरच सल्फा, कार्बन, ऑक्‍सिजन आणि नायट्रोजनचे नमुने गोळा केले आहेत. सन 2015 मध्ये त्याने जैविक अणूंचा शोध घेतला होता. सध्या लाल ग्रहावर चाललेल्या लाल वादळाची ते तपासणी करत आहे. हे लाल वादळ मंगळावर 6 जूनपासून चालू असून त्याच्यामुळेच नासाच्या मंगळावरील दुसऱ्या रोव्हर ऍपॉर्च्युनिटीबरोबर संपर्क तुटला होता.

क्‍युरियासिटीने जमा केलेली माहिती मानवाला मंगळावार पाठवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शाबीत होणार असल्याचे खगोलविदांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)