अमेरिकन दुताला अपमानास्पद वागणूक दिल्याचा पाकचा इन्कार

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकार अमेरिकेच्या पाकिस्तानातील दूतांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केला आहे. पण पाकिस्तान सरकारने मात्र इन्कार केला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही दूताने आमच्याकडे तशी तक्रार केलेली नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पॉम्पेओ यांनी अमेरिकन खासदारांच्या एका शिष्टमंडळापुढे बोलताना ही तक्रार केली होती. त्यावर प्रतिक्रीया देताना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहमद फैजल म्हणाले की कोणत्याही देशातील राजनैतिक दुतांना पाकिस्तानात कसल्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेत असतो. या सर्व दूतांना राजनैतिक करारानुसार पुर्ण मोकळीक आणि सन्मान दिला जातो. त्यामुळे आमच्या विरोधात केल्या गेलेल्या या आरोपात कोणतेही तथ्य नाही.

अमेरिकेकडून पकिस्तानला दिली जाणारी मदत कमी करण्यात आली आहे त्या विषयी फैजल यांना विचारले असता ते म्हणाले की अमेरिकेने या वर्षीच्या सुरूवातीलाच पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा विषयक सारी मदत थांबवली आहे. कोऍलिशन सपोर्ट फंडातून आम्हाला मिळणारी मदतही बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तथापी सुरक्षा विषयक मदतीने या क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होते त्यामुळे ही मदत सुरूच ठेवण्याची सूचना आम्ही त्या देशाला केली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)