अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: निशिकोरीचे आश्‍चर्यकारक पुनरागमन

न्यूयॉर्क: निशिकोरीला मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षीची अमेरिकन ओपन आणि यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. परंतु त्यानंतर नियोजनपूर्वक पुनरागमन करणाऱ्या निशिकोरीला जोकोविचवर मात करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

निशिकोरीने याआधी 2014 मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु त्याला सिलिचकडूनच पराभव पत्करावा लागला होता.

आजच्या विजयामुळे निशिकोरीने त्या पराभवाची परतफेड केली आहे. पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपान्त्य सामन्यात स्पेनच्या अग्रमानांकित राफेल नदालसमोर तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रोचे कडवे आव्हान आहे. नदालने डॉमिनिक थिएमचा प्रखर प्रतिकार पावणेपाच तास रंगलेल्या उपान्त्यपूर्व लढतीत संपुष्टात आणला.

तर अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत डेल पोट्रोने अमेरिकेच्या 11 व्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान मोडून काढले. इस्नरच्या पराभवामुळे पुरुष एकेरीतील अखेरच्या अमेरिकन खेळाडूचे आव्हान संपुष्टात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)