न्यूयॉर्क: पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या केई निशिकोरीसमोर सहाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचचे आव्हान आहे. माजी विजेत्या नोव्हाक जोकोविचने उपान्त्यपूर्व फेरीत फेडररला चकित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित जॉन मिलमनचे आव्हान 6-3, 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये मोडून काढत तब्बल 11व्यांदा अमेरिकन ओपनची उपान्त्य फेरी गाठली.

फेडररला चकित करणाऱ्या मिलमनकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु जोकोविचने त्याला संधीच दिली नाही. जोकोविचविरुद्ध पुढच्या सामन्यात खेळण्यापूर्वी मला खूपच प्रगती करावी लागेल, अशी कबुली मिलमनने दिली. विम्बल्डन विजेत्या जोकोविचला आता सलग दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी आणखी दोन विजयांची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)