अमेरिकन ओपन टेनिस : फेडररचा तियाफोवर पिछाडीवरून विजय 

न्यूयॉर्क: या स्पर्धेत पहिल्यांदाच अग्रमानांकन मिळालेल्या राफेल नदालसह माजी विजेत्या रॉजर फेडररनेही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. नदालने सर्बियाच्या दुसान लाजोविकचा 7-6, 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र फेडररला अमेरिकेच्या फ्रॅन्सिस तियाफोकडून अनपेक्षित प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. तियाफोने पहिला सेट जिंकून फेडररला हादरा दिला. फेडररने सलग दोन सेट जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. मात्र तियाफोने चौथा सेट जिंकत 2-2 अशी बरोबरी साधत अनपेक्षित निकालाची तयारी केली. अर्थात फेडररने आपला अनुभव पणाला लावताना 4-6, 6-2, 6-1, 1-6, 6-4 अशी बाजी मारली. परंतु फेडररचा खेळ विम्बल्डन विजेत्याला साजेसा नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)