अमेरिकन ओपन टेनिस : प्लिस्कोव्हा, ऑस्टापेन्को यांची आगेकूच

कॅरोलिना प्लिस्कोव्हा

न्यूयॉर्क : गतविजेती अँजेलिक कर्बर पहिल्याच फेरीत गारद होत असताना अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा, पाचवी मानांकित मॅडिसन कीज, बारावी मानांकित येलेना ऑस्टापेन्को आणि 23वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हा या महिला मानांकितांनी पहिल्या फेरीत चमकदार विजयाची नोंद केली. तसेच यानिना विकमायर व सोराना सिर्स्टिया या बिगरमानांकित खेळाडूंनीही सरळ सेटमध्ये विजय मिळविताना दुसरी फेरी गाठली.

येलेना ऑस्टापेन्को

प्लिस्कोव्हाने मॅग्दा लिनेटचा 6-2, 6-1 असा धुव्वा उडविला, तर ऑस्टापेन्कोने लारा आरुआबारेनावर 6-2, 1-6, 6-1 अशी झुंजार मात केली. मॅडिसन कीजने एलिस मेर्टेन्सला 6-3, 7-6 असे पराभऊत केले. तर स्ट्रायकोव्हाने मिसाकी दोईवर 6-1, 6-3 असा विजय मिळवीत दुसरी फेरी गाठली. यानिना विकमायरने 28व्या मानांकित लेसिया त्सुरेन्कोवर 6-3, 6-1 अशी सनसनाटी मात केली. तर सिर्स्टियाने लेस्ली केरखोव्हला 6-3, 6-1 असे नमविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)