अमेठीत पत्रकारावर गोळीबार

अमेठी (उत्तरप्रदेश) – अमेठीत एका प्रसिद्ध हिंदी दैनिकाच्या पत्रकारावर गोळीबार करण्याचा प्रकार काल रात्री घडला त्यात हा पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. दिलीप कौशल असे या पत्रकाराचे नाव असून ते अमर उजाला या दैनिकासाठी काम करीत आहेत.

मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर लगेच पळून गेले त्यामुळे त्यांचा ठावठिकाण आजही लागू शकला नाही. या हल्ल्यात कौशल यांच्या हातात गोळ्या घुसल्या आहेत. पुर्व वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेच्या विरोधात अमेठीतील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रकारांवर होणाऱ्या या वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात त्यांना निवेदन सादर केले. पत्रकारांना कायमच दहशतीच्या सावटाखाली काम करावे लागते अशी तक्रार त्यांनी यात नोंदवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)