अमेठीतील शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी पाठवली इस्रायली केळीची रोपे

लखनौ: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या वारंवार भेट देऊन तिथल्या मतदारांना आकर्षित करून घेत असतात. पण आता राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. स्थानिक शेतकऱ्यांसाठी राहुल गांधी यांनी इस्रायलमधील केळीची रोपे पाठवून दिली आहेत.

राहुल गांधी यांच्या यापूर्वीच्या अमेठी दौऱ्यादरम्यान एका स्थानिक शेतकऱ्याने त्यांच्याशी केळी लागवडीविषयी चर्चा केली होती. त्यानुसार राहुल गांधी यांनी या स्थानिक शेतकऱ्यांसाठी केळीची 40 हजार रोपे पाठवून दिली आहेत, असे कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अंशु अवस्थी यांनी पीटीआयला सांगितले. केळीची ही रोपे “जी-9′ प्रजातीची असून इस्रायलवरून मागवण्यात आलेली आहेत. याची वाढ वेगाने होत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ शकतो. या रोपांचे वाटप स्थानिक शेतकऱ्यांमध्ये करण्याची जबाबदारी खेतिहार मजदूर कॉंग्रेसचे प्रमुख अनिल शुक्‍ला यांच्यावर सोपवण्यात आली आहे. केळी रोपांचे वाटप इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी सुरू झाले आणि सोनिया गांधी यांचा वाढदिवस असलेल्या 9 डिसेंबरपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)