अमेठी – अमेठी विकासाच्या विषयावरून खूपच मागे पडली असून त्याला कॉंग्रेसचे येथील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत अशी टीका भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. गांधी कुटुंबाने गेली पाच दशके येथील जी विकास कामे दुर्लक्षित केली होती ती मोदी सरकारने चार वर्षात मार्गी लावली असा दावाहीं त्यांनी केला.

राहुल गांधी यांच्या प्रस्तावित अमेठी दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की राहुल गांधी यांना या मतदार संघात जादा दौरे करायला आम्ही भाग पाडू असे जे आश्‍वासन आम्ही दिले होते ते आश्‍वासन आम्ही पुर्ण केले असून राहुल गांधी आता अमेठीचे वारंवार दौरे करू लागले आहेत असे त्या म्हणाल्या. माझ्यामुळेच ते येथे वारंवार येऊ लागतील असे आपण सन 2014 च्या निवडणुकीत म्हणालो होतो ते आता खरे ठरत आहे असेही त्या म्हणाल्या.

अमेठीत चार वर्षात झालेल्या कामांची माहिती देताना त्या म्हणाल्या की स्वच्छ भारत योजने अंतर्गत येथे स्वच्छतेची मोठी कामे झाली आहेत. या मतदार संघातील 180 गावात शंभर टक्के शौचालये उभारली गेली आहेत. या कामांतून हा भाग विकास पासून आत्ता पर्यंत कसा वंचित राहिला होता हे आता उघडपणे दिसून येत आहे असे त्या म्हणाल्या. या मतदार संघात भाजपचा उमेदवार विजयी होत नसला तरी हा भाग विकासापासून मागे राहु नये अशी मोदींची इच्छा आहे त्यानुसार येथे विकासाचे काम मार्गी लागत आहे असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)