अमृत योजनेतील झाडे संगोपना अभावी धोक्‍यात

सातारा- अमृत योजनेतून लावण्यात आलेली झाडे संगोपनाअभावी मृत होण्याची भिती आहे.काळजीपूर्वक लावलेल्या झाडांचं संगोपन निष्काळजीपणे केल्यामुळे झाडांची मरणासन्न अवस्था झाली आहे. सातारा नगरपरिषदेच्या वतीने अमृत योजनेतून शहर परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यामध्ये राजपथ, राधिका रोड, जिल्हाधिकारी कार्यालय ते विसावा नाका या ठिकाणी व इतरत्र झाडे लावण्यात आली होती. सातारा नगरपरिषदेच्याच दारासमोरील आवारातील झाडाला संरक्षण करणारे ट्रीगार्ड नाहीत.शहर परिसरात संबधीत संस्थेच्या माध्यमातून लावलेली झाडे मरणासन्न अवस्थेत दिसून येत आहेत.

या लावलेल्या झाडांना वाचवण्याची किंवा संगोपनाची जबाबदारी एकट्या नगरपरिषदेची नसुन यामध्ये सातारकर नागरिक व पर्यावरण प्रेमीनी देखील सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. ही झाडे कशी बशी तग धरून आहेत. त्यांना वाढण्यासाठी दैनंदिन पाणी, खत सोबत आधारासाठी ट्रीगार्ड बसविणे आवश्‍यक आहे. मात्र शहरातील कित्येक ठिकाणची ट्री गार्ड चोरीला गेले आहेत. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र राज्याने केला. वृक्षसंवर्धनाच्या शपथा शाळा महाविद्यालये इतकेच काय शासकिय कार्यालयात देखील घेण्यात आल्या. प्रभात फेऱ्या वर्तमान पत्रांमधून मोठ्या जाहिराती देखील प्रसिध्द झाल्या मात्र आज या अमृत योजनेतील लावलेल्या झाडांना मृत होऊ द्यायचे का त्यांचे रक्षण करायचे याबाबत विचार व कृती करणे आवश्‍यक बनले आहे.ज्या परिसरात झाडे लावली आहेत तेथील नागरिकांनी वेळोवेळी झाडांच्या बाबतीत लक्ष देणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा नगरपरिषदेच्यावतीने वृक्ष संवर्धन व संगोपन समित्या तयार करणे अत्यावश्‍यक बनले आहे. विविध योजनेच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते वृक्ष प्रेमी व पर्यावरण प्रेमीच्या सहकार्याने वृक्ष चळवळ अधिक सक्षम करून हरित सातारा साठी प्रामाणिक प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. यांच्या माध्यमातून लावलेली झाडं त्याचे संवर्धन त्याचा अहवाल बनविणे त्यावर लक्ष ठेवणे व ठराविक काळापर्यंत त्यांचे संगोपण करण्याची जबाबदारी घेणे अश्‍या गोष्टी करता नगरपरिषदांनी पुढाकार घेऊन वृक्ष संगोपन संवर्धन समितीची नियुक्ती केल्यास या प्रकारे होणारे झाडांचे नुकसान भविष्यात टळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)