अमृतवाहिनीत 23 जूनला मार्गदर्शन कार्यशाळा

संगमनेर – येथील अमृतवाहिनी महाविद्यालयात अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण प्रवेश नियमावलीबाबत माहिती देण्यासाठी 23 जूनला मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.

ते म्हणाले की, विद्यार्थी आणि पालक अपुऱ्या माहितीमुळे चुकीच्या महाविद्यालयांची निवड करतात. यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे टाळता येऊ शकते. कार्यशाळेत नाशिक येथील तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डी. पी. नाठे, नाशिक शासकीय तंत्रनिकेतनचे एल. एस. पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित झाल्यानंतर 22 जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे. यानंतर लगेचच प्रवेशाची प्रथम फेरी सुरू होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी असेल, ऑप्शन फॉर्म कसा भरावा, कोट्यासाठी ऑप्शन फॉर्म कोणी भरावा, सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी कुठल्या शिष्यवृत्ती आहेत, शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी उत्पन्न मर्यादा किती असावी, अपंगांसाठी आणि सैनिकांच्या मुलांसाठी राखीव जागेचे प्रमाण, महाविद्यालयाचे वाटप झाल्यानंतर फ्रीज, स्लाईड, फ्लोट या पर्यायांचा वापर कसा करावा, त्यात पर्यायी महाविद्यालयांची नावे कशी द्यावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)