अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले कांदा काढणी यंत्र राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

संगमनेर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित स्वयंचलित कृषियंत्रे बनविण्याच्या स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मावेरिक्‍स संघाला राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यंत्राला उकृष्ठ रचनेसाठी 25 हजार, उत्कृष्ठ निर्मितीसाठी 25 हजार व उत्पादकतेसाठी 25 हजार असे एकुण 2 लाख 75 हजार रुपयांची बक्षिसे मिळाली आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कांदा तिफन यंत्राची पाहणी माजी कृषी मंत्री व शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज केली. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने गुणवत्ता जपली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात वाव देतांना संशोधनावर भर दिला आहे. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी चांगल्या पदावर काम करत आहे. खरे तर राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे ही संशोधनाची केंद्र ठरली पाहिले. अमृतवाहिनीतील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीवरच भर दिला पाहिजे. येथे सातत्याने विविध विषयांवर संशोधन झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात संशोधनात मोठा वाव आहे. या नवीन कांदा काढणी यंत्रामुळे शेतकर्‍यांच्या वेळेची व श्रमाची बचत होणार आहे. आज शेतकर्‍यांपुढे समस्यांचे डोंगर आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी संशोधन करा. तंत्रज्ञानाची कास धरा असा मौलीक सल्ला देतांना मायभगीनींसाठी आधुनिक घास कापणी यंत्र ही तयार करावे असे आवाहन केले.

 

मजुरांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी व काळाची गरज ओळखून कमी खर्चात कांदा काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र आरेखनाचे राहुरी कृषी विद्यापीठ येथे झालेल्या स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले. संघाने तयार केलेले आरेखन, संरचना, उपयुक्‍तता व किंमत या कसोट्यांवर आधारित घटकांचे परीक्षण करण्यात येऊन उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्यामुळे संघाला प्रथम मानांकन मिळाले. या यंत्राच्या निर्मितीसाठी विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. वाकचौरे, प्रा. बी.के. वर्पे, महेश हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत संघाचा कॅप्टन प्रशांत कानडे व मेकॅनिकेल विभागातील 24 विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले होते. संघातील सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्यांची असल्यामुळे शेतीसाठी उपयुक्‍त व आर्थिकदृष्ट्‌या कमी खर्चात यांत्रिकीकरण उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची जॉन डीअर, वाहन विकास संस्था पुणे येथील शास्त्रज्ञ यांनी प्रशंसा केली. कांदा काढणी यंत्र बनविणाऱ्या 25 विद्यार्थ्यांमधील संघप्रमुख प्रशांत कानवडे याची जॉन डिअर कंपनीत तर इतर 5 विद्यार्थ्यांची कमीन्स इंडिया लि. या कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कांदा काढणी यंत्रात आठ एच पी चे इंजिन असून एका लिटरमध्ये हे यंत्र 3 तास चालते. तर दिड तासात 1 एकर शेतातील कांदा काढण्याचे काम करते. याची किंमत अवघी 1 लाख 75 हजार आहे.यापूर्वीदेखील कॉलेजमधील मेकॅनिकल विभागाच्या एसएई क्‍लबने राष्ट्रीयस्तरावरील बाहा, सुप्रा तसेच इफ्फी सायकल या स्पर्धांमध्ये लक्षणीय यश संपादन केले. मेकॅनिकल विभागाच्यावतीने यापूर्वी खुरपणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र, स्वयंचलित दूध काढणी यंत्र आदी शेती उपयोगी अवजारे विकसित केलेली आहेत.

यावेळी संस्थेचे विश्‍वस्त लक्ष्मणराव कुटे, शरयुताई देशमुख, उपसभापती नवनाथ आरगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, प्राचार्य केशवराव जाधव, डॉ. चव्हाण, प्राचार्य शिरभाते, विभागप्रमुख डॉ. व्ही.डी. वाकचौरे, उपप्राचार्य अशोक मिश्रा, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, श्रीमती जे.बी. शेठ्ठी, प्रा. जी.बी. काळे, प्रा. आर.एस. ताजणे, आर.एन. कानवडे, डॉ. एम. आर. वाकचौरे, नामदेव गायकवाड आदिंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश यांनी केले. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. व्ही.डी. वाकचौरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
99 :thumbsup:
95 :heart:
25 :joy:
22 :heart_eyes:
27 :blush:
3 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)