अमृतमय संजीवनी कपालभाती (भाग- २)

अमृतमय संजीवनी कपालभाती (भाग- १)

कपाळ म्हणजे मस्तक भाती याचा अर्थ दीप्ती आभा किंवा प्रकाश अर्थात्‌ तेज, ज्यामुळे बुद्धी तेजस्वी होते व या शुद्धिक्रियेमुळे तेजवृद्धी होते याची पद्धती ही भस्त्रिका प्राणायामामधे आहे. जी आपण जे पूरक, रेचक, करतो त्यावरच आधारित आहे. फक्‍त यामधे अर्थात्‌ श्‍वास हा शक्‍तीवर्धक बाहेर सोडला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्‍त श्‍वास सोडण्यावरच ध्यान दिले जाते. श्‍वास आत घेता येईल तेवढा घेतला जातो व पूर्णपणे एकाग्रतेने श्‍वास हा बाहेर सोडतात.

प्रयत्नपूर्वक रेचक कपालभातीमध्ये पोटाची आकुंचन प्रसरणाची क्रिया होते तसेच मूलाधार चक्र, स्वाधिष्ठानचक्र व मणिपूर चक्रावर विशेष बळ खर्च होते. प्रत्येकाने कपालभाती प्रक्रिया ही कमीतकमी 5 मिनीटे रोज अवश्‍य करावी. कपालभाती करतानादेखील प्रत्येकाने एक संकल्प करावा लागतो, तो असा. कपालभाती प्राणायाम करताना मनात असे विचार करावेत.

ज्यावेळी मी श्‍वास बाहेर सोडतो तेव्हा माझ्याबरोबर माझ्या शरीरातील ताण तणाव, रोग, दोष तसेच विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष इत्यादी भावना ज्या माझे मन संभ्रमित करतात त्यांचा त्याग मी करीत आहे. या संकल्प विचाराने रेचक करावे. अशा प्रकारे परमेश्‍वराची आराधना करीत वरीलप्रमाणे दोष, रोग जात आहेत या विचाराने श्‍वास सोडावा. त्याचा शरीराला लाभ होतो.

कपालभाती करताना तीन मिनिटे प्रथम नियमित चालू ठेवावे. पहिल्यांदा कपालभाती करताना जेव्हा जेव्हा थकायला होते तेव्हा तेव्हा विश्रांती घ्यावी व परत सुरू ठेवावी. 1 ते 2 महिन्यांनंतर नियमित 5 मिनिटे न थांबता आपण कपालभाती करू शकतो. प्रथम करताना पोटात किंवा कमरेत वेदना होतात.

पण नंतर मात्र ह्या वेदना कमी होतात. ग्रीष्म ऋतूत पित्तप्रकृतीच्या माणसांनी रोज दोन मिनिटे कपालभाती करावी. प्रथम एकट्याने न करता योग्य योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावी. कपालभातीची पूर्व तयारी योग्य पद्धतीने करावी. योग्य ते आसन घालावे. शक्‍यतो पद्मासन वा वज्रासन घालावे. विशिष्ट पद्धतीने हातांची मुद्रा करावी लागते. ही पालथी द्रोण मुद्रा असते.

कपालभातीचे फायदे
मेंदू चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतो आणि बुद्धिमत्ता वाढते. जेवढी कपालभाती करण्याबाबत रोजची आपली नियमितता असेल तेवढा आपला चेहरा हा ओजस्वी, तेजस्वी, आभा व सौंदर्यपूर्ण होतो.

कफरोग, दमा, श्‍वसनाचे रोग, ऍलर्जी, सायनस ह्या रोगांचा नाश नियमित कपालभाती केल्याने होतो. हृदय, फुप्फुसे तसेच डोक्‍याचे, मेंदूचे सर्व विकार दूर होतात. स्थूलत्व, मधुमेह, गॅस, आम्लपित्त, किडनी विकार इत्यादी रोग कपालभातीने बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

आम्लपित्त कपालभाती प्राणायामाच्या नियमित रोजच्या 5 मिनिटाच्या सरावाने बरे होतात. मधुमेहातील शर्करा नियंत्रण नियमित कपालभाती प्राणायामाने होते. पोट सुटलेले असल्यास एका महिन्यात 4 ते 7 किलो वजन कमी झाल्याचे कपालभाती प्राणायामाने प्रयोगाने सिद्ध झाले आहे. हृदयाला जर भोक असेल तर ते हळूहळू भरून निघते. त्याचा त्रास कमी होतो. मन स्थिर, शांत व प्रसन्न राहाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो. डिप्रेशनपासून सुटका होते. म्हणून आजकाल कामाच्या तणावाखाली सतत वावरणाऱ्यांनी रोज कपालभातीची नियमित तीन आवर्तने करावीत. कपालभातीमूळे मूलाधार चक्रापासून सहस्राधारचक्रापर्यंत सर्व चक्रांमधे एक दिव्यशक्‍ती वाहू लागते.

आमाशय, यकृत, प्लीहा तसेच किडनीचे विकार बरे होतात. दुर्बल आतड्यांना सबलता मिळते. एक महत्त्वाचे असे की जे फायदे आसनांमुळे शरीराला होतात तेच फायदे कपालभाती प्राणायाम नियमित केल्याने होतात. घरच्या घरी नुसते टीव्हीवर बघून अनेकजण कपालभाती करायला लागतात पण ती अचूक होते का नाही हे त्यांना समजत नाही. काही वेळा दुष्परिणाम जाणवतात. तर काही वेळा फायदा काहीच होत नाही नुसते करत रहातात हे टाळण्यासाठी आपल्या योग शिक्षकाचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे. कपालभातीची संजीवनी प्रत्येकालाच मिळाली पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)