अमित शाह अडचणीत : “मोदी देश बरबाद करतील’ असे केले भाषांतर

अनुवादकाच्या घोळाने भाजप अडचणीत 
बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचार रॅलीचा धडका लावला आहे. पण या प्रचार रॅलीदरम्यान अमित शाह यांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कारण, अमित शाह यांच्या एका प्रचार रॅलीदरम्यान भाजपच्या अनुवादकानेच “मोदी देश बरबाद करतील, असे खळबळजनक भाषांतर करून घोळ घातला.

धारवाड जिल्ह्यातील दावणगिरीमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाहांनी कर्नाटकातील सिद्धरामय्यांवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की, कर्नाटकातील कॉंग्रेसने राज्यात कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा. पण शाह यांचा कन्नड अनुवादक आणि भाजप उमेदवार प्रल्हाद जोशीने अमित शाह यांच्या भाषणाचा अनुवाद करताना वेगळाच गोंधळ घातला. मोदींजवळ दलित आणि मागसवर्गीयांसाठी कोणतेही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून पक्षालाच प्रचंड गोत्यात आणण्याचे काम केले.

तसेच अमित शाह हिंदीत भाषण करत असताना त्यांनी उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की, तुम्ही येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू इच्छिता? शाह यांचा हा प्रश्न उपस्थितांना नीट समजला नाही. त्यामुळे सर्वांनी हातवारे करुन नकार दर्शवला. त्यामुळे अमित शाह यांची मोठी गोची झाली. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांचीही जीभ घसरली होती. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना राज्यातील येडियुरप्पा सरकार अतिशय भ्रष्ट असल्याची टिप्पणी केली होती.

तर यापूर्वी चित्रदुर्गमधील प्रचारसभेतही अशाच प्रकारच्या गोंधळाचा सामना अमित शाह यांना करावा लागला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)