अमित शहा यांनी आपल्यावरील कर्ज घोषित करावे

कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली – राज्यसभेच्या निवडणूकीच्या वेळच्या प्रतिज्ञापत्रामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्यावरील कर्जाचा उल्लेख केला नसल्याबद्दल कॉंग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. अमित शहा यांचे पुत्र जय यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी दोन भूखंड गहाण ठेवले आहेत. तरीही या कर्जाचा उल्लेख अमित शहा यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नसल्याची टीका कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

-Ads-

मात्र हे आरोप सपशेल चुकीचे आणि बनावट असल्याचे म्हणून भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप प्रवक्‍ते संबित पत्रा यांनी हे आरोप फेटाळले. हे वैयक्तिक कर्ज शहा यांच्या पुत्राच्या नावे आहे. आपल्या देशामध्ये मुलाच्या कर्जासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवू शकणारे कदाचितच कोणी राजकीय नेते असतील, असेही पत्रा म्हणाले.

कॉंग्रेसने या कर्जप्रकरणांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रांमध्ये नसल्याचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे उपस्थित करण्याचे ठरवले आहे. अमित शहा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)