अमित शहा यांच्या सुटकेला आव्हान न देण्याचे सीबीआय कडून समर्थन 

मुंबई: बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न देण्याच्या निर्णयाचे सीबीआयने आज उच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले. केवळ प्रसिध्दसाठी आणि राजकिय हव्यासापोटी याचिका करण्यात आली असा दावा सीबीआयच्यावतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला. उभय पक्षांच्या युक्‍तीवादानंतर न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न देणाऱ्या सीबीआयची भुमिका ही संशयास्पद असून या निर्णयाला आव्हान देण्याचे सीबीआयला निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बॉम्बे लॉएर्स असोसिएशनने जानेवारी महिन्यात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी केवळ 2014 मध्ये केंद्रात सरकार बदलल्यानंतर या प्रकरणाला वेगळी कलटणी मिळाल्याकडे लक्ष वेधले आणि दरम्यानच्या काळात घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला. तर न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर शहा यांच्या निर्दोष मुक्‍ततेला आव्हान देण्याची गरज नाही, असा निर्णय घेण्यात आला. असे अतिरिक्‍त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)