अमित शहा कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात प्रक्षोभ पसरवत आहेत- अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांचा आरोप 

नवी दिल्ली: शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जे विधान केले आहे त्यातून ते लोकांना न्यायालयाच्या निर्णयात उभे ठाकण्यास प्रवृत्त करीत आहेत असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी जनतेत प्रक्षोभ माजेल अशी जी विधाने अमित शहा यांनी केरळात केली आहेत त्याची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमित शहा यांनी शनिवारी केरळातील एका कार्यक्रमात बोलताना न्यायालयाचे या आधी जे निर्णय लोकांकडून डावलले गेले आहेत त्याची यादीच वाचून दाखवली. मशिदीवर लाऊडस्पीकरच्या संबंधात दिलेला निर्णय असो किंवा तामिळनाडुतील जलीकट्टुच्या संबंधात दिलेला निर्णय असो लोकांनी तो मानला नाही असे विधान करीत अमित शहा यांनी शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तेथील भाविकांनी जे आंदोलन सुरू केले आहे त्याचे समर्थन केले होते.

अंमलात आणण्यास अशक्‍य होईल असे निर्णय कोर्टाने देऊ नयेत असेही अमित शहा यांनी म्हटले होते त्यांची ही वक्तव्ये सरळसरळ लोकांनी न्यायालयाचे निर्णय मान्य करण्याची गरज नाही असेच सुचवणारी आहेत असे केजरवाल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)