अमित शहांनी केली येडियुरप्पांची गोची…

बंगळुरु – आजच्या पत्रकार परिषदेच्यावेळी देशातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून येडियुरप्पांची सरकार ओळखले जाईल असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने काही क्षण भाजप नेते येडियुप्पा यांची पत्रकार परिषदेत चांगलीच गोची झाली. आज या पत्रकार परिषदेला अमित शहा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्यावरील आरोपांची जंत्री वाचून दाखवली.

त्यानंतर त्यांना सिद्धरामैय्यांचे सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे असे म्हणायचे होते पण बोलण्यातील गफलतीने त्यांनी येडियुरप्पांचे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचा उच्चार केला त्यावेळी पत्रकार परिषदेत चांगलीच खसखस पिकली. त्यानंतर अमित शहा यांनी आपली चूक दुरूस्त केली. पण त्यामुळे येडियुप्पांना मात्र काही क्षण ओशाळल्या सारखे झाले होते.

दरम्यान अमित शहा यांच्या या वक्तव्याचे कॉंग्रेसने चांगलेच भांडवल केले आणि त्यांनी येडियुरप्पा भ्रष्ट असल्याचे खुद्द अमित शहा यांनीच कसे सांगितले आहे याच्या क्‍लीपा सोशल मिडीयावर पसरवण्यास सुरूवात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)