अमित शहांचा ठाकरेंना फोन ; हिंदुत्वासाठी युती करण्याचा प्रस्ताव !

मुंबई: शिवसेना-भाजपचा युतीसाठी चांगलाच डावपेच रंगला आहे. आम्हाला हिंदुत्वासाठी शिवसेनेशी युती करायची असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यासाठी लाचारी पत्कारणार नाही. तसेच शिवसेनेशी युती झाली नाही तरी आम्हाला फरक पडत नाही, असे छाती ठोकून बोलणाऱ्या भाजपने शिवसेनेनसमोर युतीसाठी प्रस्ताव ठेवला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोनवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा केली आहे. त्यांनी हिंदुत्वासाठी युती करण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. जेणेकरून पुढील निर्णय घेता येतील, असे शहांनी उद्धव यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची चांगलीच पळापळ होत आहे. शिवसेनेने आधीच युती करणार नाही म्हणून ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)