अमित पंघलकडे बॉक्‍सिंगचे ग्लोव्हज घेण्याइतकेही पैसै नव्हते

नवी दिल्ली: आशियाई स्पर्धेत शनिवारी भारताचा बॉक्‍सर अमित पंघलने ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव सुवर्णपदक जिंकले आणि साऱ्यांची वाहवा मिळवली. पण या सुवर्णपदकापर्यंतचा अमितचा प्रवास सोपा नव्हता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमितची घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती ती त्याच्याकडे बॉक्‍सिंगचे ग्लोव्हज घेण्याइतकेही पैसै नव्हते. तो बॉक्‍सिंग ग्लव्ह्ज न घालताच बॉक्‍सिंगची प्रॅक्‍टिस करायचा.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यात मैना नावाच्या गावात राहणारे अमितचे वडील विजेंदर सिंह एक गरीब शेतकरी आहेत. आपल्या एक एकराच्या जमीनीत ते गहू, बाजरीची शेती करतात. घरची परिस्थिती बेताची होती म्हणून अमितच्या मोठ्या भावाने अजय पंघल यांनी बॉक्‍सिंग सोडले. आज ते सैन्यात आहेत. अजयने यावेळी सांगितले 2011 साली शेतीत खूप नुकसान झालं होतं. आर्थिक हलाखी होती. मी तेव्हा बॉक्‍सिंगची प्रॅक्‍टीस करायचो. अनिल धाकर माझे प्रशिक्षक होते. मला आंतरराष्ट्रीय बॉक्‍सर व्हायचं होतं, पण घरच्या परिस्थितीमुळे बॉक्‍सिंग सोडून सैन्यात दाखल झालो. माझ्या पगारावर घर चालू लागलं. म्हणूनच अमितचं बॉक्‍सिंग सुटायला नको अशी माझी इच्छा होती. अमित माझं स्वप्न पूर्ण करेल अशी मला खात्री होती.’

अमितला बॉक्‍सिंगने झपाटलं होतं. त्याचे जुने ग्लोव्हज जिथे-तिथे फाटले होते. नवीन ग्लोव्हज साधारणपणे तीन हजार रुपयांना मिळतात पण तितके पैसैही नव्हते, तेव्हा ग्लोव्हज शिवाय त्याने सहा महिने प्रशिक्षण घेतलं होतं, अशी आठवण अजय यांनी सांगितली. बॉक्‍सरला योग्य आहार गरजेचा असतो, तोही अमितला नीट मिळत नसे. अमित सैन्यात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आहे. त्याने 2006 मध्ये बॉक्‍सिंग सुरू केलं. त्याने आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं अशी त्याच्या वडीलांची इच्छा आहे.

अमितकडे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे कौशल्य – सॅंटियागो निइवा

अमितकडे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे कौशल्ये आहे. तो अत्यंत मेहनती आणि बुद्धिमान बॉक्‍सर आहे, सामन्यात विविध रणनीती वापरून तो विरोधकला गोंधळून टाकतो. तो खूप चपळ आहे, सगळ्या भारतीय बॉक्‍सरमध्ये खोडकर सुद्धा. कधी कधी तो एखादा सत्र टाळतो पण पुढच्या सत्रात तो कसर काढतो. मागच्या एक वर्षात त्याने त्याच्या खेळात खूप बदल घडवून आणला आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतसुद्धा पदक जिंकले होते. असे सॅंटियागो निइवा यांनी सांगितले ते अमितचे प्रशिक्षक आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)