अमित ठाकरे यांचे आज शुभमंगल सावधान!

राजकारणातील बहुचर्चित नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे आज दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी विवाहबद्ध होत आहेत या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योजक, बॉलिवूड स्टार हजेरी लावणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे काल संध्याकाळी नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी कमी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, नारायण राणे, सपचे नेते अबु आसिम आझमी यांच्यासह इतर राजकीय नेते या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राजकीय नेत्यांच्या या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे. तसेच अंबानी कुटुंब, रतन टाटा आदी उद्योग जगतातील प्रसिद्ध व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे सकाळपासूनच विवाहस्थळी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)