अमिताव घोष यांना यंदाचा “ज्ञानपीठ’

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11 लाख रुपये, वाग्देवीची प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. ज्ञानपीठ समितीच्या आज झालेल्या बैठकीत 54 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांचे नाव निश्‍चित करण्यात आले.

ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तीन वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत. अमिताव घोष हे एक नाविन्यपूर्ण कादंबरीकार आहेत. त्यांच्या कादंबरींमध्ये ऐतिहासिक घटनांपासून आधुनिक युगापर्यंतच्या घटनांची नोंद दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमिताव घोष यांची इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये गणना होते. अमिताव घोष यांचा जन्म 11 जुलै 1956 साली पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर “द सर्कल ऑफ रीजन’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला.

घोष यांच्या ‘शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. दी सर्कल ऑफ रिजन, दी शॅडो लाइन, दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रातही काही काळ पत्रकारिता केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)