अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाची खास भेट : तमिळ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज 

अमिताभ बच्चन यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु, चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण याने अमिताभ बच्चन यांना खास गिफ्ट दिले आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज त्यांच्या पहिल्या तमिळ चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या टीझरमध्ये अमिताभ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत असून पांढरी वाढलेली दाढी, कपाळावर लाल टिळा लावलेला दिसून येत आहे.

-Ads-

‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन पहिल्यांदाच तामिळ सिनेसृष्टीत पाय ठेवत आहेत. या चित्रपटाची निर्मिती रामचरण करत असून  स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अमिताभ एका कॅमियोच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. अमिताभ यांच्यासह नयनतारा, विजय सेतुपती, तमन्ना आणि सुदीप यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)