अमिताभ बच्चन यांच्या ‘निळ्या हत्ती’चा १० लाखात लिलाव

एलिफंट परेडममध्ये सध्या सर्वात आकर्षणाचे केंद्र बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  यांचा निळा हत्ती बनला आहे. दरम्यान, या हत्तीचा नुकताच लिलाव करण्यात असून या हत्तीची तब्बल १० लाख रुपयांची बोली लावून विक्री करण्यात आलिया आहे.

मुंबईमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या एलिफंट परेडमधील हत्तींच्या विविध प्रतिकृतींचा शनिवारी रात्री लिलाव झाला. लुप्त होत जाणाऱ्या हत्तींच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या एलिफंट फॅमिलीच्या सदस्यांनी अमिताभ बच्चन यांना प्रदर्शनात त्यांच्या कल्पनेतून रंगवलेला हत्ती ठेवण्याची विनंती केली होती.

बीग बींनी देखील होकार कळवत हत्तीसाठी निळ्या रंगाची निवड केली. चित्रकाराला त्यावर पानं-फुलांची नक्षीसुद्धा काढायला सांगितली. शिवाय, अमिताभ यांचे वडील आणि ज्येष्ठ साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘आज उठा मैं सबसे पहले’ या कवितेच्या ओळीदेखील रेखाटायला सांगितल्या. बीग बींच्या कल्पनेतून सजलेला हा निळा हत्ती अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)