अमिताभ बच्चन करणार बी.एड.

अमिताभ बच्चन गोण्डाच्या विद्यापिठामधून बी.एड.ची परीक्षा देणार आहेत. ही बातमी दोनच दिवसांपूर्वी पुराव्यासकट पसरली आहे. अमिताभ बच्चन यांच्याबाबत ही बातमी कशी काय पसरली असावी, याचा उलगडा थोड्याच काळात झाला. यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आश्‍चर्य वाटले नाही, तर उत्तर प्रदेशातील राम मनोहर लोहिया अवध विद्यापिठाचा कारभार किती भोंगळ असू शकतो, याबद्दल आश्‍चर्य वाटते.

या विद्यापिठामध्ये बी.एड. करणाऱ्या अमित द्विवेदी नावाच्या एका विद्यार्थ्याला परीक्षेचे ऍडमिट कार्ड विद्यापिठाकडून पाठवण्यात आले. त्यावर नाव तर अमित द्विवेदीचे होते, पण फोटो होता अमिताभ बच्चन यांचा. यामुळे हा अमित द्विवेदी गोंधळून गेला. त्याचे नाव जरी असले तरी फोटो अमिताभ बच्चन यांचा असल्याने त्याला परीक्षाकेंद्रावर प्रवेशच दिला गेला नाही.

खूप स्पष्टिकरण दिल्यावर त्याला प्रवेश मिळाला. आता परीक्षा पार पडली, पण मार्कलीस्टवरही अमिताभ बच्चन यांचाच फोटो छापून येणार नाही ना, याची त्याला चिंता लागून राहिली आहे. मार्कलीस्टवर सेलिब्रिटीचा फोटो येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी आग्रा विद्यापिठामध्ये कला शाखेच्या एका विद्यार्थ्याच्या मार्कलीस्टवर सलमान खानचा फोटो छापून आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)