अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा कधीही आपल्या वडिलांसोबत ऑनस्क्रीन दिसलेली नाही. मात्र, दागिन्यांच्या एका ब्रँडच्या जाहिरातीच्या निमित्ताने हे दोघेही लवकरच ऑनस्क्रीन दिसणार आहेत.  बिग बी हे २०१२ सालापासून एका दागिन्यांच्या  ब्रँडशी जोडलेले आहेत. या ब्रँडची नवी जाहिरात लवकरच प्रदर्शित होणार  आहे. जी बी. विजय यांनी ती दिग्दर्शित केली आहे. बाप-लेकीमधील प्रेम आणि विश्वासाच्या नात्याची गोष्ट या जाहिरातीतून पाहायला मिळेल. श्वेता तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या ‘हटके’ स्टाइलची झलकही यानिमित्तान दिसणार आहे.

‘श्वेताने ही जाहिरात करण्यास होकार दिल्याने आम्ही खूष आहोत. ही रिअल लाइफ वडील-मुलीची जोडी जाहिरातीत पाहायला प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी आशा आहे. आमचा ब्रँड कौटुंबिक नात्यांना फार महत्त्व देतो. नव्या जाहिरातीत त्याची झलक दिसेल,’ असं संबंधित कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)