‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाच्या प्रयोगातून मिळालेले पैसे दिले केरळ पुरग्रस्तांसाठी

अभिनेते व नाटककार सुनील बर्वे यांच्या सुबक व कला कारखान्यातर्फे केरळ पुरग्रस्तांसाठी एक लाख एक हजार एक रुपयांचा धनादेश मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी अभिनेते अमेय वाघ उपस्थित होते.

हा निधी सुनील बर्वे यांनी ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या दोन प्रयोगातून मिळालेल्या पैशातून उभा केला आहे.

-Ads-

केरळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यापासून मुख्यमंत्री सहायता निधीचा ओघ सुरू असून विविध व्यक्ती, सामाजिक संघटना, सहकारी संस्था, मंदिर ट्रस्टींकडून मदत मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)