अमरावती शहर उभारणीसाठी रोखे: चंद्राबाबू नायडू

मुंब: मुंबई शेअरबाजारात अमरावती रोखे सूचीबद्ध झाले आहेत. आंध्र प्रदेश राज्याकडून ते सादर करण्यात आले असून राजधानी अमरावतीच्या उभारणीसाठी निधीचा वापर करण्यात येणार आहे. सूचीबद्ध कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती बॉन्ड 2018ची सुरुवात केली. आंध्र प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून 2 हजार कोटी रुपयांचे रोखे बाजारात आणण्यात आले असून 1.53 पटीने ते ओव्हरसबस्क्राईब झाले आहेत. जागतिक दर्जाची राजधानी उभारण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या सरकारवर गुंतवणूकदारांकडून दाखविण्यात आलेल्या विश्वासाबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी म्हटले. या रोख्यांसाठी तिमाहीला 10.32 टक्‍क्‍यांचा कुपन दर देण्यात येईल आणि 10 वर्षांच्या

रोख्यांसाठी पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असून पुढील पाच वर्षांत 20 टक्‍के रक्‍क्‍म प्रतिवर्षी काढता येईल. नवे शहर उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. तो जमा करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे रोखे बाजारात आणले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की नव्या शहराच्या उभारणीचे काम वेगाने चालू आहे. त्यासाठी इतर मार्गाने निधी उपलब्ध करण्याच्या शक्‍यतावर विचार केला जात आहे. या अगोदर काही शहरांनी काही विकास योजनासाठी या प्रकारे निधी उभा केला आहे. आता इतर शहराकडूनही असा निधी उभारण्याच्या शक्‍यतावर विचार केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)