अमरावती जिल्ह्यातील ढेंगाळा गावाच्या पुनर्वसनास मान्यता

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील साखळी नदीवरील निम्न साखळी बृहद लघु पाटबंधारे योजनेमुळे बाधित होणाऱ्या मौजे ढेंगाळा गावाच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रस्तावास आज मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे या गावातील २३ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच विविध पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात विचार करण्यासाठी राज्यातील पुनर्वसन अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक घेण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

गोदावरी खोऱ्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील साखळी नदीवर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हरणी गावाजवळ हे धरण बांधण्यात येत आहे. हे धरण २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून या धरणामुळे एकूण ९.३४ दलघमी पाणी साठा होणार आहे. या धरण प्रकल्पामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा ढेंगाळा गाव पूर्णतः बाधित होणार आहे. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव समितीपुढे आणण्यात आला. स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रस्तावास पाटील यांनी मान्यता दिली. ढेंगाळा गावातील १७ घरातील २३ कुटुंबे बाधित होणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)