अमरावतीच्या पोलीस प्रमुखांची आनेवाडी शाळेला भेट

आनेवाडी : अमरावतीचे पोलीस प्रमुख अनिल शिंगटे यांचा स्वागत करताना सुनिल फरांदे समवेत शिक्षक व पालकवर्ग.

आनेवाडी, दि. 4 (वार्ताहर) – मढे गावचे सुपुत्र आणि सध्या अमरावती येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदाची धुरा सांभाळत असलेले अनिल शिंगटे यांनी गुरुवारी आनेवाडी (ता. जावली) येथील पाटबंधारे वसाहत शाळेला सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करु, असे सांगितले.
अमरावतीचे जिल्हा पोलीस प्रमुख अनिल शिंगटे हे मर्ढे येथील आपल्या मुळ गावी आले होते. यावेळी त्यांनी आनेवाडी येथील पाटबंधारे वसाहतीत असलेल्या शाळेला सदीच्छा भेट दिली. शिंगटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. शाळेची प्रगती पाहून त्यांनी शिक्षक, ग्रामस्थ तसेच पालकांचेही कौतुक केले. शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना शाळेत पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे होत नाही. पालकांनीही मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे, असे शिंगटे यांनी यावेळी सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल फरांदे, सौ. महामुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आनेवाडी गावचे सरपंच शिवाजी गोरे, सदाशिव टिळेकर, वाय. बी. फरांदे, दिलावर शेख तसेच पालक उपस्थित होते. सौ. जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. तर गायकवाड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)