अमरावतीची पायाभरणी केली पण निधीचे काय?

अमरावती: नव्याने आखणी करण्यात आलेल्या आंध्रप्रदेश या राज्यासाठी अमरावती हे राजधानीचे ठिकाण म्हणून विकसित केले जात आहे. साऱ्या देशाला ललामभूत ठरेल अशा पद्धतीने त्याचा विकास केला जात आहे. या शहराच्या विकास कामांचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून केले पण त्यानंतर मात्र या प्रकियेतून ते गायब झाले आहेत. या शहराच्या विकासासाठी त्यांनी केंद्राकडून निधीच दिला नाही. पण तरीही आम्ही हे काम थांबू देणार नाही असे आंधप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे.

निदान अमरावतीच्या उभारणीच्या कामी तरी पंतप्रधानांनी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की या शहरासाठी केंद्र सरकारने आत्ता पर्यंत केवळ 1500 कोटी रूपये दिले आहेत. पण जेव्हा हे शहर तयार होईल तेव्हा या शहरातून केंद्र सरकारला दरवर्षी किमान 850 कोटी रूपये कररुपाने मिळणार आहेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)