अमरापूर येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

जेलभरो आंदोलन करण्याचा यावेळी दिला इशारा

शेवगाव – शेतीमालाला हमीभाव द्यावा, जनावरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करुन शेतकऱ्यांची स्थिती अतिशय हालाकीची झाली असल्याने शासनाने त्याची लवकरात लवकर दखल घेवून दिलासा द्यावा, अन्यथा जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज काकडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमरापुर ( ता. शेवगाव) येथे आज (दि.11) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अमरापूर चे माजी सरपंच विजय पोटफोडे, चंद्रकांत निकम, फलकेवाडीचे सरपंच बाळासाहेब मरकड यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, सरकारने शेती मालाला हमीभाव मिळण्यासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू करावीत आदी मागण्या करण्यात आल्या.

यावर्षी खरीप व रब्बी दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडलेले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोटफोडे म्हणाले, महसूल विभागाने त्वरित पन्नास पैशाच्या आत आणेवारी लावावी. आगोदरच शेतकरी दुष्काळामुळे कासावीस झालेला आहे यात शासनाने अधिक भर टाकू नये. यावेळी शेवगावचे महसूल मंडळ अधिकारी रवींद्र शेकटकर यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक रामराव ढाकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)