अमरापूर येथे आजपासून ‘माझी रेणुका माऊली’

मालिकेचे पुढील चित्रीकरण सुरू

शेवगाव – गेल्या मे महिन्यापासून साम टीव्हीवर दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू असलेल्या “माझी रेणुका माऊली’ या मालिकेचे पुढील चित्रीकरण श्रीक्षेत्र अमरापूरच्या रेणुकामाता देवस्थानात उद्या (दि. 1) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.

यावेळी पावसाळी वातावरण लक्षात घेऊन मंदिराला जोडूनच असलेल्या मोठ्या सभामंडपातच रेणुराजाच्या भव्य-दिव्य राजमहालाचा सेट उभारण्यात आला असून तेथेच चित्रीकरण केले जाणार आहे. रेणुका प्रॉडक्‍शनचे प्रमुख योगेश भालेराव, संदीप शितोळे, ईश्‍वर मचे, अकबर शेख, राजेंद्र नागरे, अश्‍वलिंग जगनाडे तसेच श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे प्रवर्तक प्रशांत भालेराव जातीने चित्रीकरणास मदत करत आहेत.
येथून पुढील भागाच्या होणाऱ्या चित्रीकरणामध्ये रेणुका प्रॉडक्‍शनने काही महत्त्वाचे तांत्रिक बदल केले असून प्रकाश योजना, चित्रीकरण, संकलन व दिग्दर्शनासाठी मुद्दाम मराठी भाषिक तज्ज्ञ संचाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

“जीव गुंतला’, “रक्षक’, “जगावे कोणासाठी’, “दारी’, “लग्नाची घाई आणि बाईच नाही’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच “धाडसी शिवा’ सह अनेक चित्रपटांचे कथानक लिहिणारे दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी आता या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सचिन डोंगळे यांची प्रकाश योजना असून, हरिओम ऑडिओ व्हिजन फोटोग्राफी करणार आहेत.

उद्या चोविसाव्या भागापासून पुढील भागाचे चित्रीकरण होत असून ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रवींद्र मंकणी, गायत्री देशमुख, त्रियुग मंत्री, सोनाली शेवाळे, दीपा भिंगारकर, सीमा ढोकणे त्यात भाग घेणार आहेत.

मान्यवरांची वर्दळ..

श्रीक्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी अलीकडे राज्यातील, तसेच राज्याबाहेरील अनेक मान्यवर भाविक सातत्याने येथे येत आहेत. नुकतेच कल्याण येथील अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे व किशोर रोडे यांनी या देवस्थानास भेट देऊन त्यांनी विधिवत पूजाअर्चा केली. देवस्थानचे प्रमुख प्रशांत भालेराव यांनी त्यांना आरत्यांचा संग्रह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)